Type Here to Get Search Results !

(२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन भाषण मराठी | Republic Day Speech in Marathi

(२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन भाषण मराठी | Republic Day Speech in Marathi


Republic Day Speech in Marathi: प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे आणि आपला देश २६ जानेवारी रोजी साजरा करण्याच्या तयारीत आहे. यंदा २०२२ या वर्षी भारत ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५० पर्यंत स्वत:चे संविधान नव्हते. प्रजासत्ताक दिन हा दिवस मानला जातो जेव्हा भारताचे संविधान लागू झाले. २६ जानेवारीला हा राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी देशभरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तयारी करत आहेत. प्रजासत्ताक दिनी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यामध्ये एक भाषण दिले जाते. त्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी मध्ये घेऊन आलो आहोत.


आजचा दिवस मांगल्याचा! आजचा दिवस भारतीय गणराज्याचा। आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा। माझा- तुमचा सगळ्यांचा…

आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यकमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथी गण, पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे दिशदूत माझ्या बंधू भगिनींनो…

अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी, त्या सर्व वीरांना, महापूरुषांना वंदन मी करतो… वंदन करुनी माझ्या प्राणप्रिय भारतमातेला, मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो…

आज आपला भारत देश प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या सणानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा.


१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यावर भारत देशाचा कारभार चालवण्याचे कोणतेही कायदे नव्हते. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने २ वर्ष ११ महिने १८ दिवस अथक परिश्रम करुन भारत देशाला मजबूत संविधान दिले.

२६ जानेवारी १९५० ला आपल्या देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आले. आपला भारत देश सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक देश बनला. आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखीत राज्यघटना आहे. घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहत.

आपल्या देशाला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूर वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्या शूर वीराचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यांच्यामुळेच आज आपण सुखाचे दिवस जगत आहोत.

आज देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहारा देत आहेत. या जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद ! जय भारत ।।


How do you like this post? If you like this post then definitely share  it.

Visit our blog to see such interesting posts

Our Website:- https://ebnnews24.blogspot.com

🙏 Thank you for reading this post🙏

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies